दापोलीत प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
दापोली : शहरातील आझाद मैदान येथे दत्ताराम महादेव भाताडे (५७, रा. आगरवायंगणी) यांचा आकस्मिक मृत्यू झाला ही घटना २० मार्च रोजी सायंकाळी ८.३० च्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ताराम भाताडे हे बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांचा मोठा भाऊ व ग्रामस्थांनी त्यांना अॅम्बुलन्सच्या सहाय्याने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दत्ताराम भाताडे मृत असल्याचे घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाणेत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.