पाणी हे जीवन आहे,प्राण आहे : सुहेल मुकादम
रत्नागिरी: मार्च जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो . या निमित्ताने पाण्याचे महत्त्व व संवर्धन करण्यासाठी जनजागृती मोहीमेचा शुभारंभ मा.नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते सुहेल मुकादम यांनी सुहेल मुकादम मित्र परिवार यांचे मार्फत रत्नागिरी येथील मिस्त्री हायस्कूल येथे करण्यात आला.
आपल्या भाषणात सुहेल मुकादम यांनी पाण्याचे महत्त्व सांगून
स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.असे सांगितले.
पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी ,सर्व सजीवांसाठी पाणी हे अत्यावश्यक आहे .
पाणी केवळ मानवासाठीच नाही तर पक्षी ,प्राणी ,वनस्पती इत्यादीसाठी ही आवश्यक आहे.पाणी मानवाला हायट्रेड राहण्यास व रोगाशी लढण्यास मदत करते .
पाण्याचे जतन करणे काळाची गरज आहे.
ह्याकरिता आपण सर्व सदस्य आदी ही प्रयत्नशील होतो.
आता वेळ आली आहे आपण सर्वांनी पुढाकार घेवून जनजागृती
करणेची..
त्याकरिता आज पासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी नाम फाउंडेशन चे सदस्य शाहनवाज शहा यांनी पाणी जतन करणे काळाची गरज असून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे तसेच धरण, नद्या मधील गाळ उपसून त्याचा साठा वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते भूषण बर्वे, सामाजिक वनाधिकारी शुक्ला मॅडम, संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर , मिस्त्री हायस्कूल चे मुख्याध्यापक जुबेर गडकरी यांनी मौलीक मार्गदर्शन केले.
तसेच पुढील आठ दिवसात शहरातील विविध भाग ,तेथील सोसाइटी तसेच ग्रामीण भागात ही आपण नियोजन करून मोहीम राबविणार आहोत. असे सुहेल मुकादम यांनी सांगितले .
यावेळी इम्तियाज शेख,ॲड दत्ता गिरसागर, मकबूल लाला,संजय बामणे,फादर सेबास्टियन,गॉडविन नोरोना, श्रीमती नोरोना, इम्रान सोलकर,असलम लाला,जहीर सोलकर,पत्रकार शोभना कांबळे सहीत अनेक मान्यवर,शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
