
मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील मांडवी येथे सार्वजनिक ठिकाणी झाडीझुडपाच्या आडोशाला मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेय अमोल सावंत (वय २०, रा. नाचणे पावर हाऊस, रत्नागिरी) व प्रथमेश प्रमोद सुर्वे (२४, रा. मांडवी, रत्नागिरी) अशी संशयित तरुणांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. २०) रात्री पावणे आठच्या सुमारास मांडवी येथील एका झाडीझुडपाच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे व पोलिस हेड कॉन्स्टेबल अशिष भालेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.