
चिंचघर- दस्तुरी येथे किरकोळ कारणावरून मारहाण
खेड : तालुक्यातील चिचघर – दस्तुरी येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाण प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार दोन्ही गटातील १३ जणांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीत एका गटातील पाच, तर दुसऱ्या गटातील दोघेजण जखमी झाले. शोभा जालंदर मोहिते, सुरेश जालंदर मोहिते, शितल सुरेश मोहिते, सुरज जालंदर मोहिते, प्राची सागर मोहिते (सर्व रा.चिंचगर दस्तुरी) अशी एका गटातील जखमींची नावे आहेत. जालंदर. मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांनी मारहाण करत कुटुंबियांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला प्रमोद कृष्णा चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते मित्रासमवेत दुचाकीने जात असताना सागर मोहिते याने दुचाकी अडवून ५ जणांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.