
खेड मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा
खेड : तालुक्यातील लवेल येथील ए. बी. जे. महाविद्यालय येथे एकास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी मोहित सुनील गडकरी (१९) याच्यासह अन्य तीन अनोळखी व्यक्तींवर बुधवारी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
गडकरी हा साक्षीदार स्वप्नील मंगेश जाधव यास पूर्वी वाईट शब्द बोलला म्हणून पायावर नाक घासून माफी माग, असे फर्मान सोडले होते. मात्र त्याने माफी मागण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून चौघांनी स्वप्निल जाधव यास मारहाण केली. हाताच्या ठोशाने मानेवर व हातातील कड्याने डोक्याच्या बाजूस मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.