
वाहतूकीस अडथळा करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः नाटे-बसस्टॉप (ता. राजापूर) येथील रस्त्यावर वाहतूकीस अडथळा करणाऱ्या संशयित वाहन चालकाविरुद्ध नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित चंद्रकांत करगुटकर (वय ३७, रा. आंबोळगड, ता. राजापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नाटे बसस्टॉप येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अमित करगुटकर यांनी मोटार (क्र. एमएच-०८ एजी ०१०९) ही बसस्टॉप जवळ इतर वाहनांना वाहतूकीस अडथळा होईल असे लावून ठेवली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल किरण जाधव यांनी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.