
स्वतःचे अस्तित्व लपविणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी: शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या बाजूला स्वतःचे अस्तित्व लपविणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र चंद्रकांत नेवरेकर (वय २८, रा. आदर्श वसाहत कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ११) रात्री सव्वाच्या सुमारास साळवीस्टॉप जलतरण तलावाच्या बाजूला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित नेवरेकर हा अंधाराचा फायदा घेऊन स्वतःचे अस्तित्व लपवून कोणत्यातरी चोरी अगर अदखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या सापडला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरुन पोलिसानी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.