
वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
खेड : खेड बाजारपेठेतील एका सलूनसमोर रहदारीच्या ठिकाणी टेम्पों उभा करत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी टेम्पोचालक नीलेश कृष्णा पानशेतकर (३३ रा. बंदरवाडी-कुडली, गुहागर) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याने स्वतःच्या ताब्यातील टेम्पो (एम.एच. ४६ बी. एफ. ४०८०) सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागी उभा करत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.