
भावी अभियंत्यांनी मांडल्या विकसित भारताच्या कल्पना
डिपेक्स २०२५ च्या प्रथम फेरी चे झाले प्रदर्शन
रत्नागिरी : दिनांक ६ मार्च २०२५ रोजी अभाविप रत्नागिरी, सिंधूदुर्ग, गोवा विभागाच्या डिपेक्स २०२५ ची प्रथम फेरी रत्नागिरी शहरातील लोकनेते श्यामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी येथे पार पडली. यामध्ये इंजिनीअरिंग, ITI, डिप्लोमा, कृषी महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून Mesbro कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. भास्कर आजगावकर, डीपेक्सचे समन्वयक संकल्प फळदेसाई, अभाविप प्रदेश सहमंत्री श्रेया चौघुले, TSVK संयोजकचैतन्य बोरसे, TSVK सहसंयोजक योगेश कांबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. व्ही. पाटील उपस्थित होते.
यामध्ये जवळपास १८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यासाठी १६ परिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये वेस्ट मॅनेजमेंट, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ॲग्रिकल्चर, अशा विषयांच्या प्रयोगांचे प्रदर्शन पार पडले.