
महा बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी झोनल ऑफिससमोर निदर्शने
रत्नागिरी :
बँक ऑफ महाराष्ट्रमधील “एआयबीईए”च्या सभासदांनी आज (७ मार्च) आपल्या मागण्यांसाठी झोनल ऑफिस रत्नागिरी समोर जोरदार निदर्शने केली. बँकेतून सर्व स्तरातून पुरेशी नोकर भरती करण्यात यावी, आउट सोर्सिंग बंद करण्यात यावे, मान्यताप्राप्त संघटनेला विश्वासात घेऊन कर्मचाऱ्यांची संबंधित सर्व निर्णय घेण्यात यावेत यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
बँकेतून सर्व स्तरातून पुरेशी नोकर भरती करण्यात यावी, आउट सोर्सिंग बंद करण्यात यावे, मान्यताप्राप्त संघटनेला विश्वासात घेऊन कर्मचाऱ्यांची संबंधित सर्व निर्णय घेण्यात यावेत, संघटना कार्यालयासाठी मान्यता प्राप्त संघटना म्हणून वर्षानुवर्षापासून देण्यात आलेली जागा जी बँकेने बेकायदेशीररीत्या हस्तगत केली आहे ती परत देण्यात यावी, स्पेशल असिस्टंट च्या यामध्ये देशभरातून जवळपास तीन हजार वर सभासदांनी भाग घेतला. जागा करारातील तरतुदींप्रमाणे त्वरित भरण्यात याव्यात, मुंबई हायकोर्टाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पदाधिकारी या भूमिकेतील प्रतिनिधित्वाच्या हक्काबाबत दिलेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्यांसाठी आज महा बँकेतील एआयबीईए या संघटनेने देशभरातील सर्वच्या सर्व ५२ झोनल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
याच मागण्यांसाठी यानंतर १२ मार्च रोजी झोनल ऑफिस समोर धरणे कार्यक्रम, १७ मार्च रोजी पुणे येथील बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आणि २० मार्च रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप होणार आहे.
व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन जर सन्माननीय तोडगा काढला नाही तर एप्रिल महिन्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. रत्नागिरीतील निदर्शनाचे नेतृत्व संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र गडवी व संघटन सचिव भाग्येश खरे यांनी केले.