
संडे सायकलिंग रॅली व फिट इंडिया कोस्टल गेम्स
जिल्हास्तरीय बीच कबड्डी क्रीडा स्पर्धा व वॉटर स्पोर्टस् प्रात्याक्षिकांचे आयोजन
रत्नागिरी,:- भारतीय खेळ प्राधिकरण, क्षेत्रीय केंद्र, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा व रत्नागिरी सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 9 मार्च रोजी संडे सायकलिंग रॅली सकाळी 7.30 ते 9 वाजता या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारूती मंदिर येथून रॅलीला प्रारंभ होणार आहे. संडे सायकलिंग रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलपटूंना पाणी बॉटल, अल्पोपहार व टी शर्ट देण्यात येणार आहे.*
जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 10 व 11 मार्च, 2025 रोजी फिट इंडिया कोस्टल गेम्स जिल्हास्तरीय बीच कबड्डी क्रीडा स्पर्धा व वॉटर स्पोर्टस् प्रात्यक्षिके भाट्ये बीच येथे आयोजित करण्यात आले आहे. फिट इंडिया कोस्टल गेम्स जिल्हास्तरीय बीच कबड्डी क्रीडा स्पर्धेतील विजयी व उपविजयी संघांना रोख रक्कम, ट्रॉफी, मेडल्स व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
फिट इंडिया कोस्टल गेम्स, जिल्हास्तरीय बीच कबड्डी क्रीडा स्पर्धा यामध्ये सहभागी होण्यासाठी गणेश खैरमोडे, राज्य-क्रीडा मार्गदर्शक भ्रमणध्वनी क्रमांक 9284342210 या क्रमांकावर 9 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संपर्क साधावा. जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.