
तळवट-जावळीत गावठी हातभट्टीच्या दारुधंद्यावर धाड
खेड : तालुक्यातील तळवट-जावळी देऊळवाडी येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारुधंद्यावर येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून ३,७५० रुपयांचा ऐवज जप्त केला.
या प्रकरणी एका महिलेवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये ३५ लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत करण्यात आली. या बाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत वाघ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.