
केरळ येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः रेल्वे प्रवासात श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. मुहम्मद हाबीउल्लाह अब्दुल्ला (वय ७०, रा. शरफिना मंजिल पच्चकाड अननगुर ता. कासोरगोड, राज्य केरळ) असे मृत प्रवासी वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुहम्मद अब्दुल्ला हे व्यवसाय पहाण्यासाठी मुंबईला गेले होते. रेल्वेच्या गरीब रथ ट्रेनने केरळ येथे जात असताना रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. रेल्वेस्टेशन पोलिसांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.