
चिपळुणात गावठी दारु विक्रेत्यावर गुन्हा
चिपळूण : चिपळूणसह सावर्डे या दोन ठिकाणी गावठी दारु विक्री करणाऱ्या तिघाजणांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. अनंत रामा सावर्डेकर (५३, नांदगाव), संतोष कृष्णा गमरे (५३, खांदाट), महादेव जयराम महाडिक (६५, शिरवली) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. या बाबतची फिर्याद अजय तुकाराम कडू, प्रवीण सदाशिव जाधव, किरण सुभाष केदार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत सावर्डेकर हा नांदगाव खुर्द परिसरात गावठी दारु विक्री करत होता. त्याच्याकडून ५५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संतोष गमरे हा खांदाटपाली माळरानावर गावठी दारु विक्री करत होता. त्याच्याकडून ५२० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर महादेव महाडिक हा शिरवली परिसरात गावठी दारु विक्री करत होता. त्याच्याकडून ९५० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.