
गावडे आंबेरे पाटीलवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश
रत्नागिरी : तालुक्यातील मौजे गावडे आंबेरे पाटीलवाडी येथील निलेश मधुकर पाटील यांच्या घराच्या समोर विहिरीमध्ये भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या हा वन्य प्राणी पडलेला असलेबाबत सकाळी ७.४५ वाजता पावस पोलीस ठाणे मधुन मिळालेल्या् भ्रमणध्वनी माहिती मिळाली. विना विलंब वनविभाग रेस्क्यू टीमचे साहित्य घेऊन शासकीय वाहनांमध्ये पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची पाहणी करता सदर विहिरीची खोली अंदाजे २० ते २५ फूट असून पाण्याची पातळी सुमारे १७ ते १८ फुटावर होती, विहिरीमध्ये वन्यप्राणी बिबट्या विहिरीत पाण्याच्या वर पायरीवर सुरक्षित बसलेला दिसून आला.
शासकीय वाहनातून पिंजरा उतरवून पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा विहिरीत सोडून विहिरीवर सुरक्षेच्या दृष्टीने जाळी टाकुन बिबट्याला एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यामध्ये बिबट्या घेणेस वनविभागाला यश आले. सदरचा पिंजरा विहिरीबाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कडून वैद्यकीय तपासणी केली. सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे ८ ते ९ वर्षे वयाचा आहे. तो सुस्थितीत आहे. सदर रेस्क्यूची कार्यवाही ही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण )श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कामगिरीसाठी प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, न्हानू गावडे वनपाल पाली, प्रभू साबणे वनरक्षक रत्नागिरी, श्रीमती शर्वरी कदम वनरक्षक जाकादेवी, तसेच गावच्या पोलीस पाटील, शिवार आंबेरे गावचे सौ पोलीस पाटील, श्री अनिकेत मोरे, महेश धोत्रे, स्वस्तिक गावडे, शाहिद तांबोळी तसेच गावातील सगळे ग्रामस्थ उपस्थित होते. सदरचा बिबट्या हा सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.