
पुन्हा एकदा उबाठाला गतवैभव प्राप्त होणार
रत्नागिरी : “संघटना वाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी आपआपसातले मतभेद विसरून संघटना उभारणीसाठी प्रयत्न करावेत. पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास माजी मंत्री रवींद्र माने यांनी व्यक्त केला.*
शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हा कार्यकारणी बैठक माजी खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयात काल (२० फेब्रुवारी) माजी मंत्री रवींद्र माने आणि प्रभारी जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. माने म्हणाले, “पक्षाची सदस्य नोंदणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी होईल याकडे लक्ष द्यावे आणि संघटनेतील रिक्त असलेली पदांचा आढावा घेऊन वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांच्या नेमणूकाबाबत कार्यवाही करण्यात येईल. विरोधकांकडून उठवण्यात येणाऱ्या अफवा, वावड्या याकडे लक्ष न देता परस्परांवरील असलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता सर्व पदाधिकाऱ्यांनी घ्यावी.दर महिन्यातून अशाच प्रकारे जिल्हा कार्यकारणी व अंगीकृत असलेल्या संघटनांच्या बैठका होवून आढावा घेण्यात येणार आहे.”
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी प्रभारी जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, उपजिल्हासंघटक सौ. उल्का विश्वासराव, लांजा तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचा जिल्हा कार्यकारणीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या बैठकीला उपस्थित लोकसभा महिला संपर्क संघटक सौ. नेहा माने, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, मंगेश शिंदे, संजय पुनसकर, जिल्हा संघटक सौ. वेदा फडके, जिल्हासंघटक शिव सहकार सेना चंद्रकांत शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे, उपजिल्हा संघटक सुजित कीर, उपजिल्हा संघटक सौ. धनश्री शिंदे, सौ. ममता जोशी, सौ. उल्का विश्वासराव, ऐश्वर्या घोसाळकर, विधानसभा क्षेत्र संघटक सौ. सायली पवार, रुमा देवळेकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, सुरेश करंबेळे, शेखर घोसाळे, नंददीप उर्फ बंड्या बोरुकर, विनोद झगडे, तालुका संघटक संतोष थेराडे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, संजय पवार, शशिकांत मोदी, तालुका संघटक सौ. प्राची शिर्के, पूर्वा मुळ्ये, महिला शहर संघटक सौ. नीलम हेगशेट्ये, युवासेना उपजिल्हा अधिकारी संतोष हातणकर, तालुका युवाधिकारी तेजस शिंदे, प्रसाद सावंत, शहर युवाधिकारी पार्थ जागुष्टे, माजी पंचायत समितीचे माजी सभापती अजित गवाणकर, माजी पंचायत समितीच्या सदस्या सौ. शीतल करंबेळे, तालुका सचिव प्रसाद लाड, शहर सचिव प्रशांत मुळ्ये व सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपशहरप्रमुख, माजी नगरसेवक, युवासेना महिला आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.