
नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुख श्री दत्तात्रय कदम यांची प्रभारी रत्नागिरी (दक्षिण)जिल्हाप्रमुख पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज लांजा राजापूर विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुख श्री दत्तात्रय कदम यांची प्रभारी रत्नागिरी (दक्षिण)जिल्हाप्रमुख पदावर निवड झाल्याबद्दल शिवसेना नेते तथा मा.खासदार श्री विनायकजी राऊत साहेब यांचे संपर्क कार्यालय रत्नागिरी येथे शिवसेना जिल्हा समन्वयक श्री रविंद्र डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री शेखर घोसाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री शेखर घोसाळे यांचा सत्कार प्रभारी जिल्हाप्रमुख श्री दत्तात्रय कदम यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थित रत्नागिरी तालुका महिला संपर्क संघटक सौ. वर्षा पितळे, उपतालुका प्रमुख श्री विजय देसाई, युवासेना तालुका अधिकारी श्री प्रसाद सावंत, किरण पडवळ, विभाग प्रमुख श्री प्रशांत सुर्वे, सलील डाफळे, अमित खडसोडे, मयुरेश पाटील, निखिल बने, पारस साखरे, अनिशा नागवेकर, अरुण नागवेकर, संतोष लिंगायत, समीर आखाडे उपस्थित होते.