
पोट दुखीने वृद्ध महिलेचा मृत्यू
रत्नागिरी ः पोटात दुखू लागलेल्या वृद्ध महिलेला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. इंदिरा रत्नू पाताडे (७५, रा. द्वारका अपार्टमेंट, आठवडा बाजार, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १२) सकाळी सव्वा आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंदिरा यांना मागील आठ वर्षापासून शुगर व हार्टचा त्रास जाणवत होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी त्यांच्या अचानक पोटात दुखू लागले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.