
बावनदी घाट पुलाजवळ ट्रक खड्डयात कोसळून तिघे जखमी
रत्नागिरी: मुंबई – गोवा महामार्गावर बावनदी घाट पुलाजवळ ट्रक खड्डयात कोसळून त्यातील चालकासह तिघे गंभीर जखमी झाले. आज (बुधवारी) सकाळी ८ वाजता हा अपघात झाला. जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने इस्पितळात पोहोचवले.
अपघाताची माहिती अशी – एम.एच. ०९ – बीसी ५९४१ हा सिमेट पोटी घेऊन रत्नागिरीहून देवरूखला चालला होता. बावनदी घाट पुलाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व ट्रॅक रस्त्याचे काम सुरू असलेल्या खड्डयात १० – १५ फूट खाली कोसळला. त्यात चालकासह तिघे जखमी झाले. जखमी असे – १) विनोद शर्मा, वय ५०. चालक २) कमलेश छोटुराम रावस, वय ४२. ३) गुडिया छोटुराम रावस, वय ४०. सर्व रा. जे. के. फाईल, रत्नागिरी.
जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेतून मोफत रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पुढील कारवाई रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.