भरणेनजीक अपघातात दुचाकीस्वार जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नवभारत हायस्कूलसमोर दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११.४५ च्या सुमारास घडली.
जखमी दुचाकीस्वरास सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी रूग्णवाहिकेने तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.
कुलदीप सिंग (५०, रा. हॅप्पी पंजाबी हॉटेल, कळंबणी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते दुचाकीने (एम.एच.०८/ए.आर. ८९७९) प्रवास करत असताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावरील दुभाजकावर आदळली. अपघातात त्यांना दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे.