
सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या कु. वात्सल्य मनोज तिवारी याला आदर्श स्काऊट पुरस्कार
चिपळूण – रत्नागिरी भारत स्काऊट्स गाईड्स जिल्हा संस्था रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या मान्यतेने व द कडवई उर्दू हायस्कूल यांच्या माध्यमातून दिनांक ३१ जानेवारी ते दिनांक 2 फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्हा स्काऊट गाईड मेळावा २०२४-२५ चे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडला.
तालुक्यातील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज चा विद्यार्थी कु.वात्सल्य मनोज तिवारी याला वर्ष २०२३-२४ चा रत्नागिरी जिल्हा आदर्श स्काऊट पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री विशाल भोसले यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला.
वात्सल्याने स्काऊट विभागांमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक जांबोरी (कर्नाटक,) , स्काऊट राज्य पुरस्कार , ०३ जिल्हा मेळाव्यामध्ये तसेच अखिल भारतीय पंतप्रधान ढाल स्पर्धा २०२३-२४ मध्ये सहभाग नोंदवला आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये बॉल बॅडमिंटन या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर व सॉफ्ट टेनिस , स्क्वॅश या क्रीडा प्रकारामध्ये राज्यस्तरावरती सहभाग नोंदवला. त्याचबरोबर आदर्श क्रीडा प्रबोधिनी कावीळतळी या संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला.
या सर्व विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर प्रवीणकुमार आवळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हा आदर्श स्काऊट पुरस्कार मिळवल्याबद्दल स्काऊट जिल्हा संघटक श्री रमाकांत डिंगणे , परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी , स्कूल कमिटी चेअरमन श्री विजय ओसवाल , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे , पर्यवेक्षिका सौ. सविता कर्वे तसेच शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , पालक आणि विद्यार्थ्यांनी मनापासून अभिनंदन केले.