
चक्कर येऊन चुलीजवळ पडल्याने महिला भाजली
रत्नागिरी: चक्कर येण्याची सवय असलेल्या महिला चुलीजवळ असताना अचानक चक्कर आल्याने भाजली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सानिका समीर पोसकर (३८, रा. असोले, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १) सकाळी साडेआठच्या सुमारास असोले येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सानिका यांना चक्कर येण्याची सवय होती. शनिवारी सकाळी त्या चुलीजवळ असताना अचानक त्यांना फिट आली आणि त्या चुलीजवळ पडल्या त्यामध्ये त्यांचा चेहरा भाजला. उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.