
गाणेत तरुणाची आत्महत्या
चिपळूण : गाणे-गुरववाडी येथील ऋषिकेश गमेश गजमल (२६) याने शनिवारी दुपारी १ वाजता शेतातील वाड्याच्या भालाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तो सकाळी गावातील एकाला पाण्याच्या टाकीजवळ भेटला होता. यावेळी त्याने मी आकले येथे मंडप सोडायला जाणार आहे. मात्र दुपारी २ वाजता तू शेतातील वाड्यात ये, असे सांगितले. त्यानुसार तो गेला असता तेथे त्याला ऋषिकेश हा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. त्यामुळे त्याने दिलेल्या खबरीनुसार अलोरे-शिरगाव पोलीस ठाणेत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.