
वाटदमध्ये हातभट्टीच्या दारू विक्रीवर कारवाई
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद येथील जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टीच्या दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५४० रुपयांची पाच लिटर दारू जप्त केली. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन दत्ताराम झगडे असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३१) दुपारी वाटद येथील जंगलमय भागात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५४० रुपयांची पाच लिटर दारू जप्त केली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कुलदीप दाभाडे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.