
ओरी फाटा येथे मोटारीची पादचारी महिलेसह दुचाकीला धडक
रत्नागिरी
तालुक्यातील ओरी फाटा रस्त्यावर मोटार निष्काळजीपणे चालवून पादचारी महिला व पार्किग केलेल्या मोटारीला धडक दिली. या प्रकारणी संशयित मोटार चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मकरंद महादेव कोयंडे (२७, रा. शिवडी कोळीवाडा, मुंबई) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ओरी फाटा रस्त्यावर आंब्याच्या शेडमध्ये घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालक मकरंद कोयंडे हे मोटार (क्र. एमएच-०१ ईव्ही ९९९७) घेऊन चालक गणपतीपुळे ते मुंबई असे जात होते. ओरी गावातील एका हॉटेलच्या अलिकडे आले असतान मोटार निष्काळजीपणे चालवून उजव्या बाजूने जाणाऱ्या पादचारी महिलांना मागून धडक दिली. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूला पार्किंग करुन ठेवलेली मोटार (क्र. एमएच-०८ व्ही ९७९२) धडक देऊन अपघात केला. या अपघातामध्ये पादचारी महिला मानसी प्रदीप कुळ्ये (४०, रा. धामणसे, रत्नागिरी) व प्रभावती प्रकाश सांबऱे (वय ५९, धामणसे सांबरेवाडी, रत्नागिरी) या जखमी झाल्या. तसेच मोटारीचे नुकसान झाले. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार विनोद भितळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.