
वाहनामुळे रहदारीस अडथळा ; चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः संगमेश्वर बाजारपेठ येथे रहदारीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या चालकाविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनिर इस्माईल अलजी (५०, कुरधुंडा मोहल्ला ता. संगमेश्वर) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) दुपारी बाराच्या सुमारास संगमेश्वर बाजारपेठ-कोंबडी गल्ली येथील एका चिकन सेन्टरच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालकाने मोटार (क्र. एमएच-०८ एक्स ६४१२) ही संगमेश्वर बाजारपेठ येथील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल अशी पार्क केली. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार कृष्णा जाधव यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.