
दादर-रत्नागिरी-सावंतवाडी पॅसेंजरसाठी आज शिष्टमंडळ भेटणार
रत्नागिरी
दादर – रत्नागिरी आणि दादर ö सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आज 29 जानेवारी रोजी रेल्वे महाप्रबंधकांची भेट घेणार आहेत. हे कोकणवासिय व रेल कामगार सेनेचे शिष्टमंडळ असणार आहे. सायं. 4.30 वा. मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची पुनश्च एकदा भेट घेणार व हे ट्रेन पुन्हा सुरू न झाल्यास अंतिम इशारा दिला जाणार आहे.