
रहदारी अडथळा होईल असे वाहन पार्क ; चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः सार्वजनिक रस्त्यावर रहदारीला अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या प्रवासी वाहन चालकाविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर बबन मते (४५) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २३) सकाळी साडे अकराच्या सुमारास आरवली ते मुरडव जाणाऱ्या रस्त्यावर आरवली पुलाखाली निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने प्रवासी वाहन (क्र. एमएच-०८ सी ४७७८) ही सात प्रवासी वाहतूक करणारे वाहन सार्वजनिक रस्त्यावर इतर वाहनास रहदारी अडथळा होईल असे पार्क केले. या प्रकरणी पोलिस नाईक अनिकेत चव्हाण यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.