आजपासून ९ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडणार
खेड : सीएसएमटी-मुंबई स्थानकासह मस्जिद स्थानकादरम्यान २५ जानेवारीपासून वाहतुकीसह ‘पॉवर ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या ९ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
२५, २६, २७ जानेवारी व १, २, ३ फेब्रुवारीदरम्यान हा ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे १२०५२ क्रमांकाची जनशताब्दी एक्स्प्रेस २५ रोजी दादर स्थानकापर्यंत धावेल. २२११० क्रमांकाच्या एक्स्प्रेसचा प्रवास २५ रोजी दादर स्थानकात संपेल. १२१३४ क्र.ची मंगळूर एक्स्प्रेसही दादर स्थानकापर्यंतच धावेल. २०११२ क्र.च्या कोकणकन्या एक्स्प्रेसचा प्रवास २५ रोजी ३० मिनिटे नियंत्रित केला जाईल. १२०५१ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस २६ रोजी २० ते ३० मिनिटे उशिराने सुटेल. २२२२९ क्र.ची सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसही २६ रोजी २० ते ३० मिनिटे उशिराने सुटेल. २२११९ क्र.ची सीएसएमटी मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस २६ रोजी २० ते ३० मिनिटे उशिराने सुटेल. १२०५२ क्र.ची जनशताब्दी एक्स्प्रेस २६ रोजी दादर स्थानकापर्यंत धावेल. २२१२० क्र.ची तेजस एक्स्प्रेसही २६ रोजी दादर स्थानकापर्यंतच धावेल. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.