शासकिय वैद्यकिय महविद्यालय रत्नागिरी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदु ह्रदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
रत्नागिरी : शासकिय वैद्यकिय महविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. वैद्यकिय समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव यांनी दोन्ही महापुरुषांचा अल्प परिचय उपस्थितांना सांगितला. जयंतीला शासकिय वैद्यकिय महविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. रामानंद, डॉ. रामा भोसले, प्रशासन शाखेतील तसेच शैक्षणिक विभागांतील अधिकारी – कर्मचारी व वैद्यकिय समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला.