चर्मालय येथे हातभट्टीच्या दारुची विक्री; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील साळवी स्टॉप ते चर्मालय जाणाऱ्या रस्त्यावर एका बंद टपरीच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २ हजार १०० रुपयांची दारु जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास सुरेश सनगरे (४३, रा. मिरजोळे, नाखरेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चर्मालय जाणाऱ्या रस्त्यावर एका बंद टपरीच्या पाठीमागील बाजूस निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत २ हजार १०० रुपयांची विनापरवाना दारु जप्त केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार बाळू पालकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.