
महामार्गावर धामणी येथे मारुती वॅगनार गाडीला कॅरी टेम्पोची धडक, 4 जण जखमी
कॅरी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल
संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी या ठिकाणी मारुती वॅगनर गाडीला मारुती सुझुकी कॅरी टेम्पोने अचानकपणे ओव्हरटेक करून समोरून धडक दिल्याने अपघातामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. सदरचा अपघात रविवारी रात्री धामणी रेल्वे स्थानक जवळ 9.30 वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत संगमेश्वर पोलिसांनी दिलेला माहितीनुसार संजय श्रीधर कदम, वैभव राजाराम मुरकर, ओंकार मनोहर भिडे, आणि सिद्धेश सावंत हे धामणी येथील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात होते हे सर्व मारुती वॅगनार गाडी घेऊन जात असताना चालक संजय श्रीधर कदम हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील धामणी येथे आले असताना साडेनऊ दरम्याने मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे येणारे मारुती सुझुकी कंपनीची सुपर कॅरी टेम्पो चालक दानिश बाबा अल्ली वागळे वय 34 वर्षे राहणार कोंडीवरे मोहल्ला याने वाहनाला अचानकपणे ओव्हरटेक करून समोरून येणाऱ्या मारुती वॅगनर गाडीला
जोरदार धडक दिली या अपघातात संजय श्रीधर कदम, वैभव राजाराम मुरकर, ओंकार भिडे , सिद्धेश सावंत हे चौघेजण जखमी झाले आहेत . त्यांना तात्काळ संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघाताला कारणीभूत असलेल्या दानिश वागळे राहणार कोंडीवरे मोहल्ला या चालका विरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.