
लायन्स क्लब तर्फे ‘लायन्स आर्ट ॲण्ड म्युझिक फेस्ट’ चे आयोजन
रत्नागिरी शहरात गेली 52 वर्षे समाजोपयोगी कार्ये करीत असलेल्या लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीने त्यांच्या समाजसेवाकार्यांना चालना देण्यासाठी ‘लायन्स आर्ट ॲण्ड म्युझिक फेस्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्यी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांच्या सहभागातून समृद्ध होणार असून त्या माध्यमातून मदतीसाठी नागरिकांना क्लबो अध्यक्ष गणेश धुरी यांनी आवाहन केले आहे.
येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, लायन्स क्लब ट्रस्टचे डॉ.संतोष बेडेकर, अमेय वीरकर, पराग पानवलकर, बिपीन शहा, प्रिया शेटय़े, अभिजित गोडबोले, शरद नागवेकर, ओंकार फडके, संजय पटवर्धन, प्रमोद खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये नेत्ररूग्णालय, डायलेसिस सेंटर, पाळणाघर, डायबेटीस डिटेक्शन सेंटर, श्रवण व वाचा दोष उपचारकेंद्र यासारखे कायमस्वरूपी प्रकल्प समाविष्ट आहेत.
लायन्स आय हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली 19 वर्षे सुमारे 50,000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या हॉस्पिटलमध्ये वर्षाला 3000 ते 3500 पर्यंत शस्त्रक्रिया केल्या जातात. ज्यापैकी जवळ जवळ 60 ते 65 टक्के शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. डायलेसिस सेंटरची सुरुवात फेब्रुवारी 2024 मध्ये झाली आणि आता डिसेंबर 2024 पासून रत्नागिरीमधील रुग्णांना मोफत डायलेसिस सुविधा दिली जात आहे.
या सर्व सेवा उपक्रमांसाठी निधी उभारण्याची आवश्यकता असल्याने लायन्स क्लबने निधी संकलन कार्यक्रम आयोजित केले आहेत. लायन्स आर्ट अॅण्ड म्युझिक फेस्ट या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. त्यामध्ये 31 जानेवारी रोजी मेलडीअस मुमेंट, 1 फेब्रुवारी रोजी आज्जीबाई जोरात आणि 2 फेब्रुवारी रोजी पांम हा आर.डी.बर्मन यांया लोकप्रिय गाण्यांचा इन्स्ट्रय़ुमेंटल कार्यक्रम येथील स्वा. वि.दा.सावरकर नाटय़गृहात होणार आहेत.