
शहर पोलिसांकडून मटका जुगार, मद्य प्राशन करणाऱ्यावर कारवाई
रत्नागिरी ः शहरातील मारुती मंदिर मद्य प्राशन करणाऱ्यावर व जयस्तंभ ते एसटी बसस्थानक रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजेय प्रकाश खाडे (१९) व दत्ताराम तुकाराम सावंत(४८) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना मंगळवारी (ता. १४) रात्री साडे आठव दुपारी सव्वाच्या सुमारास निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित रजेय खाडे हे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना आढळले. तर दत्ताराम सावंत हे विनापरवाना एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार चालवत असताना सापडले. त्यांच्याकडून पोलिसांनी साहित्यासह १ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल जाधव व योगेश नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन व मटका जुगार खेळ खेळविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.