
बेघर निवारा केंद्रातील वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी ः शहरातील अभ्युदयनगर येथील बेघर निवारा केंद्रात दाखल असलेल्या अनोळखी वृद्धाला अशक्तपणामुळे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. या अनोळखी पुरुषाचे वय ६६ वर्षे होते. तो बोलत नव्हता ही घटना बुधवारी (ता.१५) दुपारी पावणे दोनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. अनोळखी वृद्ध अभ्युदय नगर येथील बेघर निवारा केंद्रात दाखल होतो. बुधवारी त्याला केंद्रातील काळजीवाहक नाष्टा देण्यासाठी गेले असता त्याची हालचाल दिसून आली नाही. तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.