
खेड तळवटपाल येथे दारूधंद्यावर धाड, एकावर गुन्हा
खेड : तालुक्यातील तळवटपाल- गावठणवाडी येथील एका लाकडाच्या खोपटीच्या मागे मोकळया जागेत सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास धाड टाकून 3 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला.
रवींद्र राजाराम पाष्टे (36, रा. मोरवंडे-पंडमवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. तो गावठी हातभट्टीच्या दारी बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून रंगेहाथ पकडले. पोलीस कॉन्स्टेबल चांद्रमुंनी ठोके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.