
लांजा कुरचुंब जाधववाडी येथील वृद्धा बेपत्ता, पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
लांजा : तालुक्यातील कुरचुंब जाधववाडी येथील मनोरमा अनंत पालांडे ही ८३ वर्षीय वृद्ध महिला २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता जाधववाडी येथून बेपत्ता झाली आहे.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून सदर महिलेची उंची चार फूट पाच इंच, रंग निमगोरा, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, केस लांब व अर्धे पिकलेले अंगात लाल रंगाचा गाऊन, हातात काठी असून पोक काढून चालते. तसेच गळ्यात सोन्याची माळ, कानात सोन्याची कुडी, हातात काचेच्या बांगड्या, डाव्या पायावर जुन्या जखमेची खुण आहे.
अशी महिला कोणाला आढळून आली तर लांजा पोलीस ठाण्याशी ०२३५१-२३००३३ व ८६०५५९९८८० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लांजा पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.