
महिन्यातून ३ धनादेश ‘बाऊन्स’ झाल्यास बंद होऊ शकते सुविधा
रिझर्व्ह बँकेचा नवा निर्णय; क्लिअरींग होणार दिवसातून ७ बॅचमध्ये
दापोली
हल्ली धनादेश न वटण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हा विषय गांभीर्याने घेऊन रिझर्व्ह बँकेने या बाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या खातेदारांचे धनादेश न वटता परत जाण्याचे प्रमाण जास्त असेल, त्याचे क्रेडीट रेटींगही कमी होवू शकते आणि ज्या खात्यावर महिन्यातून ३ पेक्षा अधिक धनादेश न वटता परत जातील अशा खातेदारांची चेक बुक सुविधा बँक बंद करू शकते. या नवीन निर्णयामुळे खोटे धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्यांना चाप बसणार आहे. तसेच धनादेश ‘बाऊन्स’च्या प्रकरणांच्या दाव्यांचा न्यायालयांवर येणारा कामाचा ताण कमी होणार आहे.
दिवसातून ७ बॅचमध्ये क्लिअरींग दापोली अर्बन बँकेने या बाबत एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. यात म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्लिअरींगमध्ये पास होणाऱ्या धनादेशाची रक्कम संबंधित पार्टीच्या खात्यात त्याच दिवशी जमा होण्यासाठी १ जानेवारी २०२५ पासून चेक क्लिअरींग दिवसातून १ बॅचऐवजी ७ बॅचमध्ये केले जाणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेमध्ये होणाऱ्या ७ ‘बॅचमध्ये क्लिअरींगसाठी येणारे धनादेश पास त्याचदिवशी धना देश होणार पास करण्यासाठी किंवा न वटता परत पाठवण्यासाठी प्रत्येक बॅचला ३ तासांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे खातेदारांनी पार्टीला दिलेल्या धनादेशाच्या तारखेदिवशी तो धनादेश पास करण्यासाठी खात्यात आवश्यक रक्कम शिल्लक ठेवण्याची दक्षता घ्यावी.
धनादेश पास करण्यासाठी खात्यावर आवश्यक रक्कम शिल्लक न ठेवल्यास व त्यामुळे असा धनादेश न वटता परत आहे. गेल्यास तो धनादेश त्यानंतरच्या पुढील बॅचला क्लिअरींगसाठी सादर केला जावू शकतो व त्यामध्येही तो न वटता परत गेल्यास त्यासाठीचे चार्जेस ३५४ रूपये हे एकाऐवजी अनेकवेळा खात्याच्या नावे पडून खातेदारांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ज्या खातेदाराचे धनादेश न वटता परत जाण्याचे प्रमाण जास्त असेल, त्याचे क्रेडीट रेटींगही कमी होवू शकते. त्यामुळे खातेदारांनी अशा प्रकारे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांनी पार्टीला दिलेले धनादेश क्लिअरींगला येणाऱ्या दिवशी आपल्या खात्यावर आवश्यक असलेली रक्कम शिल्लक ठेवून बँकेस सहकार्य करावे व आपले आर्थिक नुकसान टाळावे, अन्यथा अशा खातेदारांच्या होणाऱ्या नुकसानीस बँक जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले.