कशेडी बोगद्यात २४ तास वीजपुरवठ्यासाठी प्रस्ताव
खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने खुली करण्याच्या दृष्टीने प्रलंबित कामांनी वेग घेतला आहे. बोगद्यात २४ तास वीजपुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे ११०० के. व्ही. वीज देण्याचा प्रस्ताव महावितरणकडे पाठवला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास वाहनचालकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बाजूकडील वाहतूक सुरू असून अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे बोगद्यात बऱ्याचवेळा अंधार निर्माण होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बोगद्यात विद्युतीकरणाचे काम सुरू असले तरी दिवसभरात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे वाहनचालकांना वाहने हाकताना कमालीची सावधानता बाळगावी लागत आहे, बोगद्यात सुरू असलेल्या वीजेच्या लपंडावामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कशेडी बोगद्यातील वाहतूक चर्चेचा विषय ठरली आहे. सद्यस्थितीत एका बोगद्यातून वाहतूक सुरू असून दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणासह पुलावर स्लॅब टाकण्यासाठी बोगद्यात पंखे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एका बोगद्यातून दोन्ही तांत्रिक बाबींची लवकरच पूर्तता बोगद्यात खंडित वीजपुरवठ्यामुळे वाहनचालकांच्या मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता महावितरणकडे ११०० के.व्ही. विद्युत पुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी काही तांत्रिक बाबींची लवकरच पूर्तता केली जाईल. – पंकज गोसावी, अभियंता – राष्ट्रीय महामार्ग.