
मद्य प्राशन करुन रस्त्यावर पडलेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी ः शहराजवळील काळबादेवी गावात मद्य प्राशन करुन रस्त्यावर पडलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. विकास कृष्णा मयेकर (वय ६२, रा. काळबादेवी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना २९ डिसेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापूर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विकास मयेकर यांनी मद्य प्राशन केल्याने ते रस्त्यावर पडले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.