
रत्नागिरी येथे किन्नर अस्मिता स्वयं सहाय्यता बचत गट स्थापन
नव्या क्षितिजाच्या शोधात किन्नर!
रत्नागिरी : समाजात किन्नर म्हणजे कायम हिणवलं जाणारे व्यक्तित्व! याच किंन्ररांच्या माणूस म्हणून जगण्याचे वास्तवताली या सत्य घटनांवर आधारित चित्रपटातून आपल्या समोर आले आहे. माणूस म्हणून समान संधी उपलब्ध करण्यासाठी किन्नर कोर्टात गेले आणि आता या तृतीयपंथी मंडळींना सर्वत्र स्थान मिळू लागले आहे
या तळागाळातील समाजाच्या अस्मितेचा हुंकार म्हणजे त्यांचा स्वयंसहाय्यता गट! रत्नागिरी जिल्ह्यात आता किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता गट स्थापन करण्यात आला आहे. किन्नर समाजाला जीवनमान उंचावण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्या साठी व शुभेच्छा देण्या साठी मुस्लिम वेल्फेअर सोसायटी चे अध्यक्ष निकहत डिंगनकर, सचिव वृंदा बोरकर, समाजसेविका सपंदा राना , जया डावर, सल्लागार सुहेल मुकादम उपस्थित होते .सूहेल भाई यांनी मनोगत व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
येणाऱ्या काळात किन्नर समाज आपल्या स्वबळावर उभा राहिलेला पाहायला मिळेल हीच अपेक्षा उपस्थित सर्वांनी व्यक्त केली.