
गावठी दारु विक्री प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी: शहरातील साळवी स्टॉप ते चर्मालयाकडे जाणाऱ्या एका आंब्याच्या झाडाखाली निर्जन ठिकाणी पोलिसांनी हातभट्टीची दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत 1 हजार 50 रुपयांची दहा लिटर दारु जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचीन सदानंद भरणकर (36, रा. चंपक मैदान झोपडपट्टी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. 30) दुपारी दीडच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाई संशयिताकडे साहित्यासह विनापरवाना 1 हजार 50 रुपयांची हातभट्टीची दारु सापडली. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.