
पुणे येथे झालेल्या पुरषोत्तम करंडक स्पर्धेत रत्नागिरीच्या सुपुत्राची चमकदार कामगिरी
रत्नागिरी : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत कोल्हापूरच्या देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या ‘यात्रा’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. या संघास पाच हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सध्या या कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेला रत्नागिरीचा सुपुत्र आणि या एकांकिकेतील मुख्य कलाकार पार्थ पराग पाटणे याला सर्वोकृष्ट वाचिक अभिनय नैपूण्य या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पार्थ पाटणे याची उत्कृष्ट लेदर क्रिकेटर म्हणूनही ओळख असून आता त्याने अभिनयत देखील आपली चुणूक दाखवून दिली आहे. तसेच राज्यर्षि करंडक
जिल्हास्तरीय खुली एकांकिका स्पर्धेत देखील उत्कृष्ट अभिनयाचा मान त्याला मिळालेला आहे. त्याच्या या यशाच्या मागे त्याचे आई,वडील,आजी आजोबा तसेच कॉलेज मधील शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे पार्थ याने म्हटले आहे…..