
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एज्युकेशन सोसायटी कडवईला मिळाले घवघवीत यश
संगमेश्वर : तालुक्याचे 52 वे विज्ञान प्रदर्शन कै. अनंत बन्याबा देवरुखकर हायस्कूल तुरळ येथे दिनांक 27 डिसेंबर रोजी पार पडले.* तालुक्यातून विविध गटातील विद्यार्थी, शिक्षक, परिचर या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. 150 हून अधिक मॉडेल्स या प्रदर्शनासाठी आणली गेली होती. तालुक्यातील नामांकित शाळांचा यामध्ये सहभाग होता. तालुक्याचे *गटशिक्षणाधिकारी सन्माननीय प्रदीप पाटील साहेब व तुरळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री वाडकर सर* यांच्या नेतृत्वामध्ये हे विज्ञान प्रदर्शन पार पडले.
संगमेश्वर तालुक्याच्या 52 व्या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी शाळांपैकी *एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयास तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला व महाराष्ट्र उर्दु हायस्कूल कडवई या विद्यालयास तालुकास्तरावर तृतीय क्रमांक मिळाला आहे.* हे घवघवीत यश संस्थेच्या शिरपेचात मानाचे तुरे खोचत आहे. द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयातून *कु.मरियम मुनीर हुजरे व कु मुस्कान सोहेल मोडक व कु.शिवराज वसंत धामनाक* या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला होता, त्यांनी व्याज (व्यायाम+ विज) सायकल ही संकल्पना आपल्या प्रयोगातून मांडली होती एक अशी सायकल जी व्यायामाबरोबर वीज निर्मिती देखील करेल, अशा पद्धतीचा *प्रकल्प विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रांजल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली* त्यांनी तयार केला होता. या प्रोजेक्टला तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई ची विद्यार्थिनी *कु. राहत हपसानी हिने विज्ञान शिक्षक तौफिक शेख सर* यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू प्रतिबंधक जनजागृती बोर्ड तयार केला होता. या प्रोजेक्टला तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक मिळाला आहे. तंत्रस्नेही शिक्षण देणारी शिक्षण संस्था म्हणून एज्युकेशन सोसायटी कडवई या संस्थेची ओळख आहे; त्याचीच ही उपलब्धी असल्याचे प्रतिपादन *संस्थेचे अध्यक्ष सादिक काझी साहेब* यांनी दिले. त्याचबरोबर द कडवई इंग्लिश स्कूलचे मार्गदर्शक शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक प्रांजल मोहिते , महाराष्ट्र उर्दू स्कूल कडवई चे मुख्याध्यापक रिजवान कारिगर, तौफिक शेख सर यांचे त्यांनी अभिनंदन केले. जिल्हास्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना तालुक्याच्या सन्मानाची जबाबदारी खांद्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. या यशाबाबत कडवई केंद्राचे केंद्रप्रमुख दीपक यादव साहेब, एज्युकेशन सोसायटी कडवई चे उपध्याक्ष डॉ अन्सार जुवळे साहेब, अफसर खान साहेब, सामिया मुल्ला मॅडम, तजिन कापडी मॅडम, संस्थेच्या कौन्सलर सीमा मोडक मॅडम आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.