
पटवर्धन हायस्कूलमध्ये आजपासून चित्र प्रदर्शन पाहाण्याची संधी, साडेसातशे कलाकृती
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी येथे कला व क्रीडा महोत्सव सुरू आहे. प्रतिभा संपन्न विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या सुमारे सातशे पन्नास पेक्षा जास्त कला कृतींचे प्रदर्शन दिनांक 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची कला एकाच छताखाली पाहायला उपलब्ध आहे. शालेय चित्रकला शिवाय अनेक प्रकारची चित्र मुलांनी रेखाटली आहेत, रांगोळ्या काढल्या आहेत व हस्तकला,कार्यानुभव(5वी ते 12वी) अंतर्गत वस्तू तयार केलेल्या आहेत.
या प्रदर्शनासाठी पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी सर्व बालकलाकार तसेच भारत शिक्षण मंडळ संस्था व मुख्याध्यापिका. जानकी घाटविलकर तसेच कला विभाग प्रमुख उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर , कलाशिक्षिका मुग्धा पाध्ये तसेच पर्यवेक्षक लवंदे, पर्यवेक्षिका शिरोळकर तसेच सहकारी शिक्षक गोरे, मुळीक, पवार, गुरव, राठोड, काटकर, तेंडुलकर, चव्हाण, डेंगळे केळकर, मोहिते, वैद्य, पाडळकर, फडवळे, जाधव तसेच शालेय कर्मचारी साळुंखे, भोंबल जोशी, रवी अशा अनेक लोकांचे सहकार्य लाभलेले आहे.