रेल्वेने प्रवास करणाऱ्या दापोलीतील महिलेचे 75 हजारांचे दागिने लंपास
खेड : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सावंतवाडी-दिवा गाडीतून प्रवास करणाऱ्या एका महिलेचे 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या बाबत दापोली येथील एका महिलेने तक्रार नोंदवली आहे. त्या 19 डिसेंबर रोजी दुपारी 3.10 ते 4 च्या मुदतीत सावंतवाडी-दिवा गाडीत चढल्यानंतर गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने त्यांच्या हातातील 75 हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी लंपास करत पोबारा केला. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.