
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही लग्नसमारंभासाठी पोहोचली रत्नागिरीत
रत्नागिरी: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या डान्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच आपल्या डान्समुळे आणि फॅशनमुळे चर्चेत राहणारी नोरा सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नोरा फतेहीने आपल्या अदाकारीने अवघ्या चाहत्यांना नाचवले आहे. तिचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, अवघ्या जगभरात आहे. नोरा फतेही नुकतीच रत्नागिरीत एका लग्नासाठी गेली होती. अभिनेत्री कोकणात आपल्या मानलेल्या भावाच्या लग्नसमारंभासाठी गेली होती. तिने प्रवासा दरम्यानचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे.
नोरा फतेही फक्त एक अभिनेत्री नसून ती एक प्रसिद्ध डान्सर सुद्धा आहे. शिवाय, नोरा एक व्यक्ती म्हणूनही प्रचंड भारी व्यक्ती आहे. नोराने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर प्रवासादरम्यानचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. रेल्वेचा प्रवास आणि हळदीचा खास व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “माझ्या मानलेल्या भावाची म्हणजेच अनुपच्या हळदीच्या कार्यक्रमाचा रत्नागिरीतील हा छोटा व्लॉग! हळदीसाठी आम्ही ट्रेन पकडून रत्नागिरीला पोहचलो. इतका सुंदर अनुभव… अनुप माझ्या आयुष्यात आणि टीममध्ये गेल्या ८ वर्षांपासून आहे. तो 2017 पासून माझा प्रवास कॅमेऱ्याच्या मागून कॅप्चर करत आहे, आता तो कॅमेरासमोर आहे. प्रत्येकवेळी तो माझ्यासाठी उभा राहिला आहे. त्यासाठी मी सदैव कृतज्ञ. अनुप मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा…”
नोराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दादर स्टेशन ते रत्नागिरी असा प्रवास आणि हळद समांरभातील खास क्षण पाहायला मिळत आहेत. नोराचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. नोराने कोणताही बडेजाव न करता एका सामान्य व्यक्तीप्रमाणे हळदी समारंभाचा आनंद लुटला. अनुपच्या कुटुंबियांनी तिला पाहुणी म्हणून एक सुंदर गुलाबी रंगाची साडीही दिली. तिनेही आनंदात ती साडी स्वीकारली. नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास तिनं वरूण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कड, जॉन अब्राहम आणि सलमान खान या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच नोराने अनेक टी- सीरिजच्या गाण्यांमध्ये काम केलं. नोराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चाहत्यांनी तिच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे.