
जागेच्या वादातून महिलेला मारहाण
रत्नागिरी : लगतच्या भाट्ये मूरकरवाडी येथे जागेच्या वादातून महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. मारहाण करण्यात आलेल्या महिलेने या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसानी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रमाकांत नारायण पिलणकर (७७), गणेश रमाकांत पिलणकर व ओंकार रमाकांत पिलणकर (रा. भाट्ये मूरकरवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. आरोपी व तक्रारदार यांची भाट्ये येथे सामायिक जमीन असून या जमिनीवरुन त्यांचा वाद होता. २२ डिसेंबर रोजी तक्रारदारांच्या वाटेवरुन आरोपी हे बांधकाम करत असल्याने त्याला तक्रारदारांनी आक्षेप घेतला. तसेच याविषयी आरोपींना जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी हाताच्या थापटाने व लाकडी काठीने मारहाण केली, अशी तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे.