
रत्नागिरी चंपक मैदान येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय इजतीमाचे आयोजन
रत्नागिरी : येथील उद्यमनगर भागात असलेल्या चंपक मैदान येथे जिल्हास्तरीय इजतीमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाभरातून साधारणपणे ४0000 पेक्षा अधिक लोक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.या दोन दिवशीय इज्तीमा जगात शांती व मानव कल्याण याचे वातावरण निर्माण होण्यासाठी प्रार्थना केली जाणार आहे. जगातील प्रत्येक माणसाला आनंदी जीवन जगता यावे व ईशभक्तीत तल्लीन होऊन मन पवित्र करावे यासाठी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.