
वाकेडमधील तरुणाची गळफास घेत आत्महत्या
लांजा : दारूच्या आहारी गेलेल्या तरुणाने जनावरांच्या गोठ्यामध्ये लाकडी वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील वाकेड शेट्येवाडी येथे ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकेड खालची शेट्येवाडी येथील केदार प्रदीप शेट्ये (वय ३७) याला दारूचे व्यसन होते. या नशेतच त्याने घराच्या शेजारी असलेल्या जनावरांच्या गोठ्यातील लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतला. या घटनेची खबर भाऊ सागर प्रदीप शेट्ये याने पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.